Ad will apear here
Next
प्रवास विमा घेताना...
परदेश प्रवासासोबतच देशांतर्गत पर्यटनादरम्यान आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी विमा पॉलिसी घेतली जाते; पण प्रवास विमा काढताना बरेचजण फक्त हप्त्याचा विचार करतात. त्यातील नियम व अटींची माहिती नीट घेतलेली नसते. त्यामुळे अनेकदा गरजेच्या वेळीदेखील या विमा पॉलिसीचा फायदा होत नाही...
.....
उत्पन्नातली वाढ तसंच स्वत:च्या आणि कुटुंबियांच्या सुरक्षिततेच्या जागरूकतेमुळे अधिकाधिक पर्यटक प्रवास विमा म्हणजे ट्रॅव्हल इन्श्युरन्स घेण्यावर भर देतात. परदेश प्रवासासोबतच देशांतर्गत पर्यटनादरम्यान आर्थिक संरक्षण मिळावं यासाठी विमा पॉलिसी घेतली जाते; पण प्रवास विमा काढताना बरेचजण फक्त हप्त्याचा विचार करतात. पॉलिसीच्या नियम आणि अटींची त्यांना फारशी माहिती नसते. कोणत्या परिस्थितीत विम्याचा दावा नाकारला जाऊ शकतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न सहसा केला जात नाही आणि इथेच फसगत होते.

कोणत्याही विमा पॉलिसीप्रमाणे प्रवास विम्याच्याही काही अटी आणि नियम असतात. काही गोष्टी पॉलिसीत समाविष्ट असतात, तर काही वगळल्या जातात. विमाधारकाला याची माहिती असणे गरजेचे आहे. 

मध्यंतरी मुंबईतल्या एका प्रवास विमाधारकाचा दावा फेटाळण्यात आला. प्रवासादरम्यान त्याला दुखापत झाली होती. या दुखापतीवरच्या उपचारांच्या खर्चासाठी भरपाई मिळण्याचा अर्ज त्याने केला होता, मात्र त्याचा हा अर्ज कंपनीने फेटाळून लावला. कारण या विमाधारकाला धाडसी खेळांदरम्यान ही दुखापत झाली होती आणि अशा दुखापतींसाठी नुकसानभरपाईची तरतूद त्याच्या पॉलिसीमध्ये नव्हती. यामुळे उपचारांचा सगळा खर्च विमाधारकाला करावा लागला.

पर्यटनाला गेल्यावर आपण धाडसी क्रीडाप्रकारांमध्ये सहभागी होतो. रिव्हर राफ्टिंग, गिर्यारोहण, बंजी जंम्पिंग आणि पॅराग्लायडिंगचा समावेश धाडसी क्रीडाप्रकारांमध्ये होतो. सर्वसाधारणपणे या क्रीडाप्रकारांमध्ये होणाऱ्या दुखापतींचा समावेश प्रवास विमा पॉलिसीत नसतो. इतकंच नाही तर आधीपासून जडलेल्या व्याधीमुळे त्रास झाला, तर तुमचा नुकसानभरपाईचा दावा फेटाळला जाऊ शकतो. अर्थात प्रत्येक विमा कंपनीचे नियम आणि अटी वेगळ्या असतात. काही कंपन्या आधीपासून असणाऱ्या आजारांसाठीही विमा संरक्षण देतात. त्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात नुकसानभरपाई मिळू शकते. 

पॉलिसी काढून स्वस्थ बसू नका. पॉलिसी कोणत्या तारखेपासून लागू होते, हे लक्षात घ्या. आपल्या पॉलिसीची सुरूवात पर्यटनाच्या पहिल्या दिवसापासून होत असल्याचं अनेकांना वाटतं; पण प्रत्यक्षात तसं नसतं. यामुळे वेळेआधी विमानाची तिकिटं रद्द केल्यास झालेल्या नुकसानभरपाईचा दावा फेटाळला जाऊ शकतो.

प्रवास विमा पॉलिसी म्हणजे परदेशी आरोग्य विमा पॉलिसीच असते, असं तज्ज्ञ सांगतात. कारण अचानक आजारपण आल्यास नुकसानभरपाई मिळू शकते. यासोबतच विमानाला विलंब झाल्यामुळे होणारं नुकसान, सामान हरवणं, प्रवासाचा बेत रद्द होणं, पासपोर्ट हरवणं,  विमानाच्या अपहरणामुळे होणारं नुकसान यासाठी प्रवास विम्याअंतर्गत नुकसानभरपाई मिळू शकते.

प्रत्येक विमा कंपनीचे नियम आणि अटी वेगळ्या असतात. तसंच अतिरिक्त पैसे भरून काही सुविधा मिळवता येतात. मात्र प्रवास विमा पॉलिसी घेताना नीट पडताळणी करून घेणं गरजेचं आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZIWCH
Similar Posts
आर्थिक वर्ष संपत आलंय! अजूनही गुंतवणूक केली नसेल तर ‘हे’ जरूर वाचा! २०१९-२०२० हे आर्थिक वर्ष संपायला आता केवळ दीड महिना शिल्लक राहिला आहे. करबचतीसाठी सुरुवातीपासून गुंतवणूक करणं चांगलं असलं, तरी लाखो भारतीय आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दोन-तीन महिन्यांमध्ये बचत करतात. विविध पर्याय बारकाईने तपासून पाहिल्यास आणि त्यांचा तौलनिक अभ्यास केल्यास गुंतवणुकीला नेमका अर्थ प्राप्त होतो
स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट म्हणजे काय ? बँकांमध्ये विविध प्रकारची बचत खाती उघडता येतात. सर्वसाधारण बचत खाते, नो फ्रिल्स खाते, सॅलरी अकाउंट, प्रिव्हिलेज बँक खाते, तसेच लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिकांसाठीही वेगळ्या बचत खात्यांची सोय असते. यासोबतच स्वीप इन किंवा मल्टिप्लायर अकाउंट हा एक प्रकार असतो. स्वीप इन किंवा मल्टिप्लायर या प्रकारच्या
क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्जाविषयी.. क्रेडिट कार्डने वारेमाप खर्च केल्यानंतर या पैशांच्या परतफेडीचा प्रश्न उभा राहतो. ही रक्कम वेळेत भरली नाही, तर बराच दंड आकारला जातो. शिवाय क्रेडिट स्कोअर ही खराब होतो. अशा परिस्थितीत मदतीला येते ते क्रेडिट कार्ड टेकओव्हर कर्ज....
कोट्यधीश बनवणारी पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना सर्वसामान्य गुंतवणूकदारांना आजही म्युच्युअल फंड, शेअर्सपेक्षाही मुदत ठेवी, प्रॉव्हिडंट फंड, पोस्टातल्या बचत योजना अशा गुंतवणूक योजना सुरक्षित व आपल्याशा वाटतात. पोस्टाची ‘पीपीएफ’ योजना ही त्यापैकीच एक. नियमित आणि सातत्याने गुंतवणूक केल्यास कोट्यधीश बनवणारी ही योजना आहे. त्याविषयी...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language